Ad will apear here
Next
‘अॅडोब चॅम्पियनशिप’ स्पर्धेसाठी कृष्णा सुतारची निवड
पुण्यात झालेल्या परीक्षेत मिळवले सर्वाधिक गुण

पुणे : पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या ‘अॅडोब चॅम्पियनशिप’मध्ये पुण्यातील पी. ए. इनामदार कॉलेजची विद्यार्थिनी कृष्णा सुतार भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. नुकत्याच पुण्यात झालेल्या परीक्षेत तिला सर्वाधिक गुण मिळाल्याने तिला ही संधी मिळाली आहे.  

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्टस्’च्या ४० विद्यार्थ्यांनी फोटोशॉप प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत या ‘अॅडोब चॅम्पियनशिप’ स्पर्धेत भाग घेतला होता. या परीक्षेत  कृष्णा सुतार हिने सर्वाधिक गुण मिळवले. आता २०२० मध्ये अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेच्या पुढील टप्प्यात ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.  

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, कॉलेजचे प्राचार्य डॉ. ऋषी आचार्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या वेळी एस. बी. एच. इनामदार, झुबेर शेख, हर्षद सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZUJCD
Similar Posts
डॉ. पी. ए. इनामदार आणि ‘वेदा’ कॉलेजला ‘जीवनगौरव’ पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आणि सोसायटीच्या ‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्ट स्कूल’ (VEDA) ला ‘एनडी वर्ल्ड’चे संस्थापक, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला.
अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार यांचा गौरव पुणे : ‘विजापूरहून केवळ १५ रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेचे कार्य वाढवले. या संस्थेच्या आज ३१ शाळा, महाविद्यालये आहेत. २८ हजार विद्यार्थी संस्थेत शिकत आहेत. या यशामध्ये ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम
स्वातंत्र्यदिनानिमित्त आझम कॅम्पसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आझम कॅम्पसमध्ये ‘हाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष मुन्नवर पीरभॉय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. सी. ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते.
इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅशनल अॅक्रिडिटेशन पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (पदविका) महाविद्यालयाला ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन’ने मूल्यांकन करून प्रमाणित केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ते २०२० या तीन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मिळाले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language